डॉ.जे.जे.मगदूम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची निवड
टाटा मोटर्स आणि याझाकी सह चेन्नईच्या लेविवान कंपनीमध्ये 38 विद्यार्थ्यांना रोजगार
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ.जे.जे.मगदूम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल लि. पुणे, याझाकी इंडिया प्रा. लि. पुणे व लेव्हिवान सोल्युशन, चेन्नई या नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे. यात संस्थेमध्ये झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये फिटर, इलेक्ट्रीशियनट्रेडच्या एकूण 38 विद्यार्थ्यांची अंतिम अभिनंदनिय निवड झाली आहे. संस्थेचे चेअरमन डॉ.श्री.विजयराज मगदूम, व्हा.चेअरपर्सन ॲड.डॉ.सौ.सोनाली मगदूम ,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. सुनिल आडमुठे , कॅम्पस डायरेक्टर श्री. संदीप रायान्नावर यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाबरोबरच सॉफ्ट स्किल व ऑन जॉब ट्रेनिंग आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाल्याचे प्राचार्य श्री.संदीप पांडव यांनी सांगितले. संस्थेत 2026-27 या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तरी 10 वी पास विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0