डॉ.जे.जे.मगदूम फार्मसी महाविद्यालयाची उज्वल परंपरा कायम
डी फार्मसी प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के
जयसिंगपूर : प्रतिनिधी
येथील डॉ.जे.जे.मगदूम फार्मसी कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करीत महाविद्यालयाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. डी. फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई (MSBTE) उन्हाळी परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के लागला. शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राख राखल्याने अभिनंदन होत असून
डी. फार्मसी प्रथम वर्षात कु. अर्जुन कुराडे (86.00%) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कु. मृणाल रजपूत (84.50%), कु. साक्षी टकले (82.90%), कु. श्रेया खोलकुंबे (82.50%) आणि कु. सानिका पाटील (81.30%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
तसेच डी.फार्मसी द्वितीय वर्षाचा निकाल 99.00% लागला असून कु. नफिसा शेख (86.36%) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर कु. वैष्णवी दाडमोडे (84.27%), कु. निकिता दुस्सा (82.91%), कु. अलीशा शेख (82.64%) आणि कु. अनिकेत पाटील (81.64%) यांनीही उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली.
या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस-चेअरपर्सन अॅड. डॉ. सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ.सुनिल आडमुठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शितलकुमार पाटील,डिप्लोमा विभाग प्रमुख डॉ.एस.व्ही. मगदूम,डिप्लोमा अध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.उल्लेखनीय यशामागे त्यांची अथक मेहनत, पालकांचे सहकार्य, प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तसेच संस्थेचे चेअरमन, व्यवस्थापन आणि संस्थेच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे प्राचार्यांनी नमूद केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
1
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0