शरद इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत निवड

Jul 20, 2026 - 19:50
 0  6

यड्राव : प्रतिनिधी 

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील ६ विद्यार्थ्यांची टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत निवड झाली. टीसीएस डिजिटल व टीसीएस निंजामध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील अक्षयकुमार सिंग, वेदांत कुलकर्णी तर आर्टिफिशल इंटेलिजेंन्स अॅण्ड डाटा सायन्स विभागातील अनुराधा पाटील, रबिया गवंडी, सादिया भोकरे, समृध्दी पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही टाटा समूहाची जगप्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनी असून आयटी सेवा, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, क्लाउड, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रात जागतिक स्तरावर कार्यरत आहे. ५५ हून अधिक देशांमध्ये उपस्थिती, ६.२ लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. टीसीएसला भारतातील तसेच जगातील अग्रगण्य आयटी कंपन्यांमध्ये स्थान आहे. त्यामुळे टीसीएसमध्ये विद्यार्थ्यांची निवड होणे ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जाते.

महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या 'शरद पॅटर्न'अंतर्गत उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्यविकास आणि प्लेसमेंट-केंद्रित प्रशिक्षणाला विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामध्ये स्पेशल अॅप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यु यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसीपीक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तंज्ञामार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. शेवटच्या वर्षी सहा महिने इंडस्ट्री इंटर्नशिप असते. या सर्वाचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाला. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0