श्री दत्तचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांच्या शोध निबंधाला प्रथम क्रमांक

Jul 29, 2026 - 13:36
 0  5
श्री दत्तचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांच्या शोध निबंधाला प्रथम क्रमांक

शिरोळ : प्रतिनिधी

    श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांना द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचा कै. के. एस. काळे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या शोधनिबंधाला कृषी विभागामधील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या 71 व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. 

श्री दत्त साखर कारखान्यामध्ये श्रीशैल हेगाण्णा हे मुख्य शेती अधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांनी 'बेनिफिट्स ऑफ सब सरफेस ड्रेनेज टेक्नॉलॉजी फॉर सॉईल सलानिटी कंट्रोल सस्टेनाबिलिटी ऑफ एग्रीकल्चर अँड ऍबसोल्युट कॉन्ट्रीब्युशन ऑफ ड्रेनेज इन शुगर केन फार्म इन्कम' या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. परीक्षक समितीने याची निवड प्रथम क्रमांकासाठी केली आहे. जे. डब्ल्यू. मॅरियट हॉटेल, पुणे येथे आयोजित 71 व्या वार्षिक अधिवेशनात त्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे. उद्यानपंडित गणपतराव दादांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्ष क्षारपड जमीन सुधारणेच कार्य उत्कृष्ट सुरु असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा शोधनिबंध सादर केल्याचे हेगाणा यांनी सांगितले. त्यांना श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0