डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची 'पार्श इन्फोटेक' मध्ये निवड

Jul 28, 2026 - 10:33
 0  14
डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची 'पार्श इन्फोटेक' मध्ये निवड

 जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांची 'पार्श इन्फोटेक प्रा.लि.'या माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सौरभ खानावळे यांनी दिली.

महाविद्यालयातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या कु.ओंकार गोरे, ए. आय.डी.एस. विभागाच्या कु. अरमान शिकलगार,वैष्णवी डवरी व श्रेया भस्मे ,कॉम्प्युटर विभागाच्या ओंकार जाधव व स्नेहल कलगुटगी आणि ई टी सी विभागाच्या नम्रता गुर्जर, श्रद्धा जगताप व तनिष्का शिरोळकर या विद्यार्थ्यांचा निवडीमध्ये समावेश आहे. 'पार्श इन्फोटेक'हि कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब व मोबाईल ॲप्लिकेशन, क्लाऊड कॉम्प्युटिंग, ए.आय. एम.एल.आणि डिजिटल सोल्युशन्स या क्षेत्रात कार्यरत आहे.

ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हाईस चेअर पर्सन डॉ.सोनाली मगदूम, कार्यकारी संचालक डॉ.सुनील आडमुठे प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सर्व विभाग प्रमुख व प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0