डॉ.मगदूम अभियांत्रिकीच्या १२ विद्यार्थ्यांची टी.सी.एस. कंपनीत निवड

Jul 28, 2026 - 10:42
 0  8
डॉ.मगदूम अभियांत्रिकीच्या १२ विद्यार्थ्यांची टी.सी.एस. कंपनीत निवड

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील डॉ.जे.जे.मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांची टी.सी.एस.या नामांकित कंपनीत नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सौरभ खानावळे यांनी दिली.

 टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS)हि टाटा समूहाची जागतिक स्तरावरील अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान (I.T.) क्षेत्रातील कंपनी आहे. सॉफ्टवेअर विकास,डिजिटल तंत्रज्ञान,कृत्रीम बुद्धिमता(AI), क्लाऊड कॉम्पुटिंग आणि आय.टी.क्षेत्रात टी.सी.एस. उत्कृष्ट कार्य करत आहे. गुणवत्ता पूर्ण प्रशिक्षण, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि जागतिक करिअरच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या उत्तम कंपन्यांशी महाविद्यालयाचा सामंजस्य करार आहे त्यामुळेच आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या कंपनीमध्ये नोकरीच्या संधी देण्यासाठी यशस्वी झालो आहोत असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील म्हणाल्या. 

 निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कु.श्रेया मणीकेरी,अनिशा पाटील,श्रुती रजपूत,अमन मोमीन,रुचा भाटे,शेख मुस्कान,किरण चव्हाण,गुलशन मुल्ला,सुशांत कुंभार,प्रतीक्षा मजले,शिवम नलवडे व कोमल शिरोळे आदी समाविष्ट आहेत.कंपनीकडून त्यांना वार्षिक रु.३.७ लक्ष पासून पुढचे पॅकेज देण्यात आले आहे. 

 ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम, व्हाईस चेअर पर्सन डॉ.सोनाली मगदूम,कार्यकारी संचालक डॉ.सुनील आडमुठे प्राचार्या व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सर्व विभाग प्रमुख व प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0